Majhi Ladki Bahin Yojana Shasan Nirnay मित्रांनो नमस्कार, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प दिनांक 27 जून 2024 रोजी हा जाहीर झाला, आणि यामध्ये महाराष्ट्रातील जनतेसाठी अनेक योजनांच्या घोषणा करण्यात आल्या.
यातच महत्त्वपूर्ण घोषणा महिलांसाठी करण्यात आल्या महिलांसाठी दोन मोठ्या योजनांच्या घोषणा या अर्थसंकल्पात सादर करण्यात आल्या आहेत.
या अर्थसंकल्पात महिलांसाठी सर्वात मोठी योजना म्हणजेच “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ही सुरू करण्यात आली “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेत या महिलांना प्रति दरमहा
1500 रुपये लाभ देण्याची घोषणा या अर्थसंकल्पात सादर करण्यात आली. अर्थसंकल्पात योजनेची घोषणा केल्यानंतर दिनांक 28 जून 2024 रोजी महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र शासन
यांच्याकडून महत्त्वाचा शासन निर्णय हा “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू करण्याचा जो निर्णय आहे हा शासन निर्णय या संदर्भात जारी करण्यात आला आहे.
Table of Contents
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज कसा करावा ?
आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना नेमकी काय आहे ? या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील कोणत्या महिला घेऊ शकतात ? यासाठी कोणकोणती पात्रता, कागदपत्रे, तसेच अटी, शर्ती
अर्ज कुठे कसा करायचा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज कसा करावा ? व कुठे कसा सादर करायचा याची सविस्तर माहिती शासन निर्णय जाणून घेणार आहोत.
त्याकरिता हा आर्टिकल तुम्हाला संपूर्ण वाचायचा आहे, ही वेबसाईट पूर्णतः फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठीच सुरू करण्यात आलेली आहे.
जेणेकरून या योजनेची संपूर्ण माहिती एकाच वेबसाईटवर एकाच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल, यासाठी माझी लाडकी बहीण योजना ही वेबसाईट तुमच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे.
Majhi Ladki Bahin Yojana Shasan Nirnay 2024
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ही योजना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात केली आहेत.
याचा शासन निर्णय हा महिला व बालविकास विभाग यांच्याकडून दिनांक 28 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. आता ही योजना सर्वच राज्यातील महिलांना या ठिकाणी वरदान ठरणार आहे.
कारण या योजनेतून महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहे. त्यात महिन्याला 1500 रुपये कोणत्या महिलांना दिले जाणार आहे. याची संपूर्ण माहिती योजने संदर्भात खाली पाहायला मिळणार
महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण 50% पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील श्रमबल पाहणी नुसार पुरुषांचे रोजगाराची टक्केवारी 59.10% व स्त्रियांची टक्केवारी 28.70% इतके ही सर्व वास्तु स्थिती लक्षात घेता महिलांची आर्थिक, आरोग्य परिस्थिती सुधारणा करणे हे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माहिती
यासाठी महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वालंबनासाठी राज्यात अनेक विविध योजना आणि वर्षांपासून राबवण्यात येते आहेत. यातच आता नवीन योजना या अर्थसंकल्पात सुरू करण्यात आले आहेत. महिलांचा सर्व सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे,
त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो आणि या सर्व सदर परिस्थिती लक्षात घेता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणांमध्ये सुधार करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांच्या निर्णयाक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ही सुरू करण्याचे प्रस्तावित होते.
यासाठी शासनाने 28 जून 2024 रोजी या योजनेला मंजुरी दिलेली आहे. आता शासन निर्णय काय आहे संपूर्ण समजून घेऊया. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणांमध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांचे निर्णय भूमिका मजबूत करण्यासाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र फॉर्म” सुरू करण्यात आले आणि याला शासनाने मान्यता दिली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे उद्दिष्ट काय ?
राज्यात “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” ही सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने अर्थसंकल्पात घेतला, आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या योजनेची अंमलबजावणी पुढील महिन्यात म्हणजेच 01 जुलैपासून करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ? हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहेत. या योजनेचे उद्दिष्ट खालील प्रमाणे आहे.
- महाराष्ट्रातील महिला व मुलींना पुरेशा सोयी-सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे
- महिला व मुलींचे आर्थिक सामाजिक तसेच पुनर्वसन करणे
- महाराष्ट्रातील महिला स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे
- राज्यातील महिलांना आणि तसेच मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे
- महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे स्वरूप ?
पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी द्वारे सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम बँक खात्यात दिली जाणार आहे.
तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभच्या योजनेअंतर्गत 1500 रुपये पेक्षा कमी लाभ महिला घेत असतील तर त्या फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेला देण्यात येणार आहे. हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत दिली जाणार आहे आणि या योजनेचे हे स्वरूप आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी पात्रता काय ?
महाराष्ट्रात सुद्धा मध्य प्रदेश सरकार राबवत असलेली लाडकी बहीण योजना ही योजना आता महाराष्ट्र राज्याने देखील सुरू केली आहे. महिलांना 1500 रुपये दरमहा देण्यात येणार आहे. यासाठी लाभार्थी पात्रता काय ? कोणत्या महिला या योजनेचा लाभ घेऊन दरमहा 1500 रुपये मिळू शकतात ? यासाठी पुढील पात्रता असण गरजेच आहे.
महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील अविवाहित, विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यकत्या आणि निराधार महिला राज्याच्या माझी लाडकी बहीण योजना या योजनेतून दरमहा 1500 रुपये लाभ घेण्यासाठी पात्र असणार आहेत.
माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता ?
माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता ?
- लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक
- राज्यातील अविवाहित, विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यकत्या आणि निराधार महिला
- किमान वय 21 पूर्ण व कमाल वय 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत
- सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणं अनिवार्य
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2 लाख 50 हजार रुपये पेक्षा जास्त नसावेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपात्र लाभार्थी ?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अपात्र लाभार्थी ? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत कोणत्या महिला या योजनेसाठी अपात्रता आहेत ? याची माहिती खाली देण्यात आली आहे संपूर्ण माहिती वाचावी.
- ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांच्या अधिक आहे
- ज्यांचे कुटुंबातील सदस्य आयकर दाता आहे
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, म्हणून सरकारी विभाग / उपक्रम / मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत कार्यरत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहे. परंतु बाह्य यंत्रणा द्वारे कार्यरत असलेल्या तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत.
- सदर लाभार्थी महिलांनी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1500 रुपये पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड / कॉर्पोरेशन / बोर्ड / उपक्रमाचे अध्यक्ष / उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत
- ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर जास्त जमीन असेल
- ज्यांच्याकडे चार चाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे
- सदर योजनेच्या “पात्रता” व “अपात्रता” निकषामध्ये सुधारणा करण्याच्या आवश्यकता असल्यास नियोजन वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई या ठिकाणी करण्यात येते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कागदपत्रे
माझी लाडकी बहिणी योजना लाभ घेण्यासाठी खालील आवश्यक कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे.
- योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
- आधार कार्ड
- महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला
- सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयापर्यंत असणं अनिवार्य)
- बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
- पासपोर्ट आकारासह फोटो
- रेशन कार्ड
- सदर योजनेच्या अटी, शर्तीचे पालन करण्याबाबत हमीपत्र.
वरील कागदपत्रे हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत.
महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी निवड ?
योजनेचे लाभार्थीची पात्रता : अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्य सेविका / सेतू सुविधा केंद्र / ग्रामपंचायत / ग्रामसेवक ? वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणीत केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक असणार आहे.
सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरिता अंगणवाडी सेविका / पर्यवेक्षिका / मुख्य सेविका / सेतू सुविधा केंद्र / ग्रामपंचायत / ग्रामसेवक / वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या खालील तक्त्यामध्ये देण्यात आल्या आहेत.
अ.क्र. | कार्यक्षेत्र | लाभार्थ्याची अर्ज स्वीकृती/तपासणी/पोर्टलवर अपलोड करणे | अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर | अंतिम मंजुरी देण्याकरिता सक्षम अधिकारी |
1 | ग्रामीण भाग (Rural) | अंगणवाडी सेविका/ पर्यवेक्षिका / सेतू सुविधा केंद्र / ग्रामपंचायत / ग्रामसेवक | संबधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी | संबधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती |
2 | नागरी भाग (Urban) | अंगणवाडी सेविका / मुख्य सेविका / वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र | संबधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी | संबधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती |
नियंत्रण अधिकारी :- आयुक्त, महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य, पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहणार आहेत. तसेच आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही नवी मुंबई हे सहनियंत्रण अधिकारी असणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज करण्याची प्रक्रिया 2024
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाचे अर्ज पोर्टल / मोबाईल ॲप द्वारे / सेतू सुविधा केंद्र द्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. यासाठी पुढील प्रक्रिया विहित करण्यात आली त्याची पूर्ण माहिती खाली देण्यात आली आहेत.
पात्र महिलास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार
ज्या महिलांना ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय / नागरी / ग्रामीण / आदिवासी / ग्रामपंचायत / वार्ड / सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी उपलब्ध असेल.
वरील भरलेलं फॉर्म अंगणवाडी केंद्रात / बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय / नागरी / ग्रामीण / आदिवासी / सेतू सुविधा केंद्र मध्ये नियुक्त कर्मचारी ऑनलाइन प्रवेश केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेला अर्जासाठी यथायोग्य पोच पावती देखील मिळणार आहे.
अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असणार
अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल
जेणेकरून त्यांचा थेट फोटो काढता येणार आणि ई-केवायसी देखील करता येणार यामध्ये महिलांची ई-केवासिक करण्यात येणार आहे.
कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र (रेशन कार्ड)
स्वतःचे आधार कार्ड
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तात्पुरत्या यादीचे प्रकाशन ?
अर्ज प्राप्त झाल्यानंतर अर्जदारांनी तात्पुरती यादी पोर्टल/ ॲप वरती जाहीर केले जाणार आहे. आणि त्यानंतर त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावर सूचना फलकावर देखील लावण्यात येणार आहे.
आक्षेपांची पावती : जाहीर यादीवरील हरकत पोर्टल / ॲप द्वारे प्राप्त केल्या जाणार, याशिवाय अंगणवाडी सेविका/ मुख्यसेविका / सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत तक्रार नोंदवता येणार यासाठी लेखी ऑफलाइन प्राप्त झालेल्या हरकत रजिस्टर मध्ये नोंदवले जातील.
ऑनलाईन अपलोड केले जाणार आहे. पात्र लाभार्थी यादी जाहीर केल्या दिनांक पासून पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदविणे आवश्यक असणार आहे. सदर हरकतीचे निवारण करण्यासाठी संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती देखील या ठिकाणी गठीत करण्यात येणार आहे. आणि अंतिम यादीचे प्रकाशन देखील या ठिकाणी होणार आहे.
अंतिम यादीचे प्रकाशन : कसे केले जाणार आहे, सदर समिती मार्फत प्राप्तहर कधीच निरांकण करण्यात येणार आहे. त्यासोबत लाभार्थीचे अंतिम यादी देखील केली जाणार, सदर पात्र अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र / ग्रामपंचायत / वार्ड स्तरावर / सेतू सुविधा केंद्र / तसेच पोर्टल ॲपवर देखील जाहीर केली जाणार आहे. पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्या सदर महिलांचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे हे देखील लक्षात घ्यायचं. त्यानंतर लाभाची रक्कम वितरण देखील करण्यात येणार आहे. प्रत्येक पात्र महिन्याच्या तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात हस्तांतरण म्हणजे डीबीटी द्वारे बँक खात्यात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मार्फत रक्कम जमा केली जाणार आहे.
योजनेची प्रसिद्धी : गावपातळीवर होणाऱ्या ग्रामसभा महिला सभांमध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी असे देखील अपडेट आहे.
या योजनेचे पोर्टल आणि एप्लीकेशन आहे. हे या ठिकाणी विकसित केले जाणार आहे. ही योजना खास करून महिलांसाठी मोठी वरदान ठरणार आहे. राज्यस्तरीय जिल्हास्तरीय समितीमध्ये तसेच योजनेच्या अंमलबजावणी सुकरव्हावी यासाठी कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचा अधिकार माननीय मंत्री महिला व बालविकास यांना राहणार आहे.
तसेच महिला व बालविकास यांच्याकडून सदर योजनेचा आढावा दर तीन महिन्यांनी घेण्यात येणार आहे. सदर योजनेचे मूल्यांकन महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा ही टेबल मध्ये खाली देण्यात आलेली आहे.
उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेंतर्गत नोंदणी बाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना या ठिकाणी प्रकाशित करण्यात येणार आहे. योजनेच्या अवलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता भासल्यास नवीन मार्गदर्शन निर्गमित देखील होणार आहे. सदरी योजनेची अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांचे सहकार्य घेण्यात येणार आहेत.
तसेच कालबद्द पद्धतीने पात्र लाभार्थींची यादी अंतिम निर्णय व सदर योजने पासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे. अशा पद्धतीने महाराष्ट्र शासनाने राज्यांमध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू केलेली आहे. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून दिनांक 28 जून 2024 रोजी हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत शासन निर्णय या पोर्टलवर प्रकाशित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज कसा कुठे करायचा ?
राज्यामध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू करण्यात आली. आणि या योजनेचे अर्ज ऑनलाईन पोर्टल आणि एप्लीकेशन द्वारे हे मागविण्यात येणार आहे.
यासाठी नारी शक्ती दूत App विकसित तर वेब पोर्टल हे विकसित करण्यात येत आहे. हे पोर्टल शासनाचे किंवा अधिकृत पोर्टल नाही हे सर्व सामान्य पोर्टल आहे.
नारी शक्ती दूत App डाउनलोड करा
या पोर्टलवर राज्यातील महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची माहिती देणारं सर्व साधारण वेबसाईट आहे याची नोंद घ्यायची आहे योजनेचे ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत App सुरु झाले आहेत. अधिक माहितीसाठी यासाठी वेबसाईट ला भेट देत रहा धन्यवाद.