Majhi Ladki Bahin Yojana Helpline Number | माझी लाडकी बहीण योजना हेल्पलाइन नंबर

Majhi Ladki Bahin Yojana Helpline Number नमस्कार, राज्यामध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची जोरदार चर्चा सुरू चालू आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली मिळते. काही पात्र महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले आहेत.

उर्वरित अर्जांची तपासणी चालु आहे. याच दरम्यान काही पात्र महिलांना अद्याप निधी मिळालेला नाही, तसेच काही महिलांना कागदपत्रांची अडचण येत आहे. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी महिलांनी नेमके काय करावे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेल्पलाइन टोल फ्री संपर्क क्रमांक : 181

Majhi Ladki Bahin Yojana Helpline Number महिलांना मिळणार 4500 रुपये

कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यात या योजनेचे दोन महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा झाले आहेत. 31 जुलैपूर्वी अर्ज भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या महिलांना हा लाभ मिळाला आहे. आता 31 जुलैनंतर आलेल्या अर्जांची तपासणी चालु असून सप्टेंबर महिन्यात पात्र महिलांना तीन महिन्यांचे 4500 रुपये मिळतील.

2 कोटींहून अधिक अर्ज

महिला वर्गाकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत 2 कोटी 3 लाख 94 हजार 924 अर्ज दाखल झाले. या अर्जांची सध्या छाननी सुरु आहे लवकरच पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिलेले आहे.

अर्ज प्रक्रियेत अडचणी

📢 हे पण वाचा :- नारी शक्ती दूत App ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ? कागदपत्रे, पात्रता संपूर्ण माहिती !

अर्ज करताना अनेक महिलांना तांत्रिक अडचणी येत आहेत. राज्य सरकारने अर्ज प्रक्रियेत सुधारणा केली आहे तरीही काही अर्ज अमान्य झाले आहेत. या अर्जांमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याची संधी महिलांना दिली जात आहे. पण दुरुस्ती कशी करावी याबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे. तक्रार दोन पद्धतीने नोंदवू शकता.

तक्रार नोदवण्याचा मार्ग

लाडकी बहीण योजनेत अर्ज करताना अडचणी येत असल्यास महिलांनी नारी शक्तीदूत एपंपवर तक्रार नोंदवू शकतात. तसेच, अंगणवाडी केंद्रावर जाऊन अंगणवाडी सेविकांच्या मदतीने त्यांच्या अडचणी सरकारदरबारी मांडता येते.

मी सुशिल पाटील गेल्या 6 वर्षापासून ब्लॉगिंग मध्ये काम करतोय मला विविध प्रकारच्या माहिती देण्यास आवडते, मी गेल्या 6 वर्षापासून सरकारी योजना, शेतकरी योजना सरकारी भरती, स्पर्धा परीक्षा, आणि नवनवीन माहिती मी माझ्या इतर ब्लॉग वेबसाईटमधून देत आहेत, ही माझी एक वेबसाईट आहेत.

Leave a Comment